सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या(Satara DCC Bank) निवडणूकीत राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे(Shashikant Shinde) यांच्या पराभवामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी साताऱ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस भवनवर(NCP Bhavan) दगडफेक केली. तसेच शशिकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी शशिकांत शिंदे यांच्या पराभवाबद्दल उद्वेग व्यक्त केला.
Satara DCC Bank Election : साताऱ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस भवनवर शिंदे समर्थकांकडून दगडफेक!
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या(Satara DCC Bank) निवडणूकीत राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे(Shashikant Shinde) यांच्या पराभवामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी साताऱ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस भवनवर(NCP Bhavan) दगडफेक केली.
कार्यकर्ते संतप्त
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणूक निकाल जाहीर होताच शिंदे समर्थकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले. मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सूचना देऊनही राष्ट्रवादीतील जिल्ह्यातील नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला.
पोलिसांनी घेतले ताब्यात
या दगडफेकीनंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित आठ ते नऊ जणांना ताब्यात घेतले. या कार्यकर्त्यांनी शशिकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या.