सातारा- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी खा. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आले आहेत. साताऱ्यात पोहोचताच जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदा ते साताऱ्यात आले आहेत. यावेळी पदाधिकारी युवक कार्यकर्त्यांनी 'मी शरद पवार', 'आम्ही साहेबांसोबतच' अशा गांधी टोप्या परिधान करून पवारांचे स्वागत केले, तसेच नागरिकांचे लक्ष वेधले.
साताऱ्यात शरद पवारांचे जंगी स्वागत - सातारा news
आज शरद पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
शरद पवारांचे स्वागत करताना
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त शरद पवार यांनी आज डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी स्थळावर जाऊन अभिवादन केले आहे.