महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपच्या काळात देशातीलशेतकरी उध्वस्त झाला, शरद पवारांचा सरकारवर निशाणा - congress

भाजप सरकारच्या काळात राज्यात १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सरकारने जनतेला धोका दिला आहे. भाजपच्या काळात शेतकरी उध्वस्त झाला असल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.

महाआघाडीची कराडमध्ये जाहीर सभा

By

Published : Mar 24, 2019, 7:19 PM IST

Updated : Mar 24, 2019, 9:18 PM IST

सातारा - भाजप सरकारच्या काळात राज्यात १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सरकारने जनतेला धोका दिला आहे. भाजपच्या काळात शेतकरी उध्वस्त झाला असल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. भाजपच्या काळात धंदे बुडले, तरुणांमध्ये बेकारीचे प्रमाण वाढल्याचेही पवार म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपापल्या जाहीर सभा घेण्यास सुरूवात केली आहे. सातारा लोकसभेचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आज कराडमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रसेचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत महाआघाडीची सभा झाली.

शेतमालाला दर नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी स्वत:ला कांद्यात गाडून घेत आहे. शेतकऱ्याला मदत करण्याची या सरकारची भूमिका नाही. जवानांनी दाखवलेल्या शौर्याचा लाभ पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत असल्याचे म्हणत शरद पवारांनी निशाणा साधला. मोदींकडे ५६ इंचाची छाती आहे तर कुलभुषण जाधव यांना पाकिस्तानातून सोडवून आणण्यासाठी ती छाती का पुढे येत नाही. या सरकारने मराठा समाजाला, धनगर समाजाला, दलितांना फसवले असल्याचेही पवार म्हणाले. फसवेगिरी हेच राज्य सरकारचे वैशिष्ट्य असल्याचेही पवार म्हणाले.

या सभेला पृथ्वीराज चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, जोगेंद्र कवाडे या प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे.

राजू शेट्टी

  • अच्छे दिन आले नाहीत. स्वप्न दाखवली पण ती भाजपने पूर्ण केली नाहीत.
  • शेतकरी अवमान योजना आणली. कुणाचेही भले झाले नाही.
  • शेतकऱ्यांची बीकट आवस्था भाजपने केल्याचेही राजू शेट्टी म्हणाले.

उदयनराजे भोसले


भाजपने वाटेल ती आश्वासने दिली. त्याला जनता बळी पडली. तळागाळातल्या लोकांना गाळात घालण्याचे काम सरकारने केले असल्याचे सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले म्हणाले.

गरिबांच्या खात्यात १५ लाख टाकू, २ कोटी लोकांना रोजगार देऊ आश्वासने भाजपने दिली त्याच काय झाल? असा प्रश्न उदयनराजे उपस्थित केला. ५ वर्षाच काय केले ते सांगा. या निवडणुकीकडे निवडणूक म्हणून पाहू नका तर चळवळ म्हणून पाहा असेही उदयनराजे म्हणाले.

Last Updated : Mar 24, 2019, 9:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details