सातारा : बांगला मुक्ती लढ्यातील भारतीय सेनेच्या विजयाप्रित्यर्थ गेली चोवीस वर्षे साताऱ्यातील कराडमध्ये विजय दिवस साजरा करण्यात ( Vijay Divas at Karad in Satara ) आला. विजय दिवस समारोह समितीतर्फे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्र आणि साताऱ्याचे मोठे योगदान असल्याचे गौरद्गगार शरद पवार ( Sharad Pawar Statement on Vijay Divas ) यांनी काढले.
Sharad Pawar : देशाच्या संरक्षणात महाराष्ट्राचे मोठे योगदान - शरद पवार - Vijay Divas
बांगला मुक्ती लढ्यासह अनेक युद्धामध्ये देशातील जवानांनी कष्ट घेतले. त्याग केला. शौर्य दाखवलं. त्यामध्ये महाराष्ट्राचे आणि सातारा जिल्ह्याचे योगदान मोठे आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar Statement on Vijay Divas ) यांनी काढले. बांगला मुक्ती लढ्यातील भारतीय सेनेच्या विजयाप्रित्यर्थ गेली चोवीस वर्षे साताऱ्यातील कराडमध्ये विजय दिवस साजरा करण्यात ( Vijay Divas at Karad in Satara ) आला. त्यावेळी ते बोलत होते.
![Sharad Pawar : देशाच्या संरक्षणात महाराष्ट्राचे मोठे योगदान - शरद पवार Sharad Pawar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17225529-thumbnail-3x2-sp.jpg)
जिल्ह्यातील सुपुत्रांनी त्याग केला : सातारा जिल्हा देशाच्या इतिहासाचा महत्वाचा भाग आहे. स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरोधात संघर्ष करण्यासाठी यशवंतराव चव्हाण, क्रांतिसिंह नाना पाटील, देशभक्त किसन वीर या सातारा जिल्ह्यातील सुपूत्रांनी मोठा त्याग केल्याचे शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले.
यंदा रौप्य महोत्सवी सोहळा -बांगला मुक्ती लढ्यातील भारतीय सेनेच्या विजयाप्रित्यर्थ गेली चोवीस वर्षे कराडमध्ये विजय दिवस साजरा करण्यात आला. यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने विजय दिवस समारोह समितीतर्फे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.