महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"ज्यांना जनतेने नाकारलं त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही" - सातारा शरद पवार पत्रकार परिषद

लोकसभा निवडणुकीसह इतर निवडणुकात लोकांनी डिपॉझिट जप्त केले. ज्यांना लोकांनी बाजूला केले, त्याची दखल कशाला घ्यायची, त्यांना काही महत्व देण्याची गरज नाही, असे शरद पवार पडळकर यांच्याबाबत बोलले.

Sharad Pawar
"ज्यांना जनतेने नाकारलं त्यांना महत्त्व देण्याचा गरज नाही"

By

Published : Jun 27, 2020, 3:06 PM IST

Updated : Jun 27, 2020, 3:54 PM IST

सातारा - भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेवर अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले. सातारा दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी 'गोपीचंद पडळकरांना काही महत्व देण्याची गरज नाही, त्यांचं अनेकवेळा डिपॉझिट जप्त झालं आहे, कशाला बोलायच' असं म्हणत टोलेबाजी केली. याशिवाय देवेंद्र फडणवीस हे काहीही बोलून प्रसिद्ध मिळवत आहेत, असं म्हणत त्यांनी फडणवीसांच्या मुलाखतीतील गौप्यस्फोटावर तिरकस निशाणा साधला.

गोपीचंद पडळकरांवर भाष्य -

शरद पवारांना गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर प्रतिक्रिया विचारली. त्यावर पवार म्हणाले, पडळकरांना मी जास्त महत्त्व देत नाही. बारामतीत लोकसभा निवडणूक लढली, त्यांचं डिपॉझिट जप्त झालं, विधानसभेची निवडणूक लढवली, तिथेही डिपॉझिट जप्त झालं. मग सांगलीत लोकसभा लढवली, तिथेही काही झालं नाही. त्यामुळे काय बोलायचं असं पवार म्हणाले. विधानसभा, लोकसभा निवडणुकीसह इतर निवडणुकात लोकांनी डिपॉझिट जप्त केले. ज्यांना लोकांनी बाजूला केले, त्याची दखल कशाला घ्यायची, त्यांना काही महत्व देण्याची गरज नाही, असे पवार म्हणाले.

कोरोनाची काळजी घेतली तर काही होत नाही -

कोरोनाबाबत योग्य काळजी घेतली तर काही होत नाही, मात्र तुम्ही एकत्र आले तर अडचण येते. राज्यातील फार लोक बाहेर गेले आहेत, मी ममता बॅनर्जी यांना फोन करून येणाऱ्यांना बोलवा असं सांगितलं. 160 ट्रेन राज्यातून गेल्या. आता पुन्हा कामगार, नागरिक, विद्यार्थी येऊ पाहत आहेत. लोकांना मदत करता आली, आता लोक पुन्हा येऊ लागले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी भीती व्यक्त केली की मुंबई नको, असे शरद पवार म्हणाले.

दररोज इंधन दरवाढ -

इंधन दरवाढ दररोज होत आहे हे इतिहासात कधी पाहिले नाही. सर्वसामान्य संकटात असताना अशा परिस्थितीत योग्य निर्णय अपेक्षित आहे. मात्र, दरवाढीने अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. घरापर्यंत परिणाम होतो, असे म्हणत पवारांनी इंधन दरवाढीवर भाष्य केले. लॉकडाऊनमध्ये लोक बोलत नाहीत म्हणून, त्याचा गैरफायदा घेतला जात आहे, असा आरोप त्यांनी सरकारवर केला.

"भारत-चीन सीमा वादावर राजकारण नकोच"

भारत-चीन संघर्ष हा गंभीर मुद्दा आहे. गलवान भागामध्ये घडलेली घटना म्हणजे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे अपयश, असे आपण म्हणू शकत नाही. संरक्षण मंत्रालयावर आरोप करणे सुद्धा योग्य नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी आजच्या घडीला चीनने भारताच्या जमिन बळकावली असेल मात्र, याआधी सुद्धा चीनने खूप वेळा जमिनीवर कब्जा केला असल्याचे म्हटले आहे.

Last Updated : Jun 27, 2020, 3:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details