सातारा -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सातार्यात आल्यानंतर महारॅलीसाठी उपस्थित राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यानी ‘मी शरद पवार,’ ‘आमचे साहेब.. पवार साहेब,’ ‘पवार साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है,’ अशा जल्लोषात घोषणा दिल्या. रॅलीसाठी हजारो युवक राष्ट्रवादीचे झेंडे, बॅनर घेवून सहभागी झाल्याने सातार्यातील वातावरण राष्ट्रवादीमय झाल्याचे पाहायला मिळाले होते.
शरद पवार यांच्या महायात्रेला साताऱ्यात उत्स्फुर्त प्रतिसाद दरम्यान, नुकतेच साताऱ्यातील दोन्ही राजांच्या व भाजपच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या महाजनादेश यात्रेची युवक राष्ट्रवादी काँग्रेसने हवा काढल्याची चर्चा सध्या साताऱ्यात सुरू आहे. राष्ट्रवादीने काढलेल्या भव्य रॅलीने साताऱ्यात राष्ट्रवादीचाच बोलबोला असल्याचे चित्र दिसून आले. तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे आगमन होताच कोण आला रे कोण आला.. मोदी शाहांचा बाप आला.. अशा घोषणाणी शहर दणाणून सोडले आणि साताऱ्यात फक्त राष्ट्रवादी आणि पवार साहेबच चालतील हा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
शरद पवार यांच्या महायात्रेला साताऱ्यात उत्स्फुर्त प्रतिसाद हेही वाचा... आघाडीचं ठरलं, युतीचं काय...?
खासदार शरद पवार यांचा रयत शिक्षण संस्थेवरील कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महारॅलीचे आयोजन केले होते. त्यानुसार दुपारी दीड वाजल्यापासूनच पवई नाका व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवकांची मोठी गर्दी झाली. दुचाकीची महारॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघण्याचे निश्चित झाल्यानंतर दुपारी अडीच वाजता खासदार शरद पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील, आ.शशिकांत शिंदे, आ.मकरंद पाटील हे पोवई नाक्यावरील शिवतिर्थावर आले. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर हे सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. शरद पवार रॅलीमध्ये सहभागी होता, तरुणाईने अक्षरश: जल्लोष केला.
शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. खासदार शरद पवार यांच्यासाठी जिप्सी ठेवण्यात आली होती. कारमधून उतरुन ते जिप्सीमध्ये बसल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी त्यांना गराडा घातला. तब्बल १५ मिनिटे हा गराडा हालण्याचे नाव घेत नव्हता. शरद पवार यांनीही तरुणाईला प्रतिसाद देत त्यांच्यासोबत सेल्फी काढली. यानंतरही युवक हालत नसल्याचे पाहून पवार यांनी सर्वांना विनंती करत पुढे चलण्यास सांगितले.
हेही वाचा... पक्षांतराचे पर्व... युतीत आले आघाडीचे 'साखर सम्राट' सर्व!