सातारा - छत्रपती शिवाजी महाराजांचा दिल्लीच्या दरबारात अपमान झाला. त्यानंतर ते दरबारातून निघून गेले आणि आता? मी एवढचं म्हणेन हे वागणं बरं नव्हे, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना लगावला. उदयनराजेंनी भाजप प्रवेश केल्यानंतर पवार पहिल्यांदाच साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी उदयनराजेंवर भाष्य केले.
मोठ्या कारखानदारांचे सरकारने 85 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिती आणि महापुराच्या संकटाकडे बघायला सरकार तयार नाही. दुसरीकडे किल्ले सरकारने विकायला काढले. त्या ठिकाणी छम छम वाजवण्याची सरकार काम करत आहे. ज्या किल्ल्यांवर स्वाभिमानाचा इतिहास घडला तिथे हॉटेल आणि बार उभे करण्याचे नियोजन हे सरकार करत आहे, असे पवार म्हणाले. पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांना दिल्लीचे आमंत्रण दिले. दरबारात सन्मान होईल, असा शब्द दिला. पण, महाराज दिल्लीत गेल्यानंतर त्यांना दरबारात मागे बसवले. महाराज तेथून बाहेर पडले. त्यानंतर त्यांना कैद करण्यात आले. मात्र, राजे त्यातूनही सुटले आणि महाराष्ट्रात परत येऊन त्यांनी इतिहास घडवला. त्यामुळे ‘हे वागणं बरं नव्हं.’ असे म्हणत पवारांनी उदयनराजेंवर टीका केली.
हेही वाचा -महाराजांच्या तलवारी चमकल्या तिथे राज्य सरकार छमछमचा आवाज करणार - शरद पवार
मी अजून म्हातारा झालो नाही