सातारा - उद्धव ठाकरेंवर राष्ट्रवादीने जादूटोणा ( NCP did black magic on Uddhav Thackeray ) केला. ते शरद पवारांकडे गेले होते. शरद पवारांच्या तावडीत सापडलेला सूटत नाही, जादूटोणा करणारा बाबा ( Bawankule criticizes Uddhav Thackeray ) देशाला अन् महाराष्ट्राला माहिती आहे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( State President of BJP Chandrasekhar Bawankule ) यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
बारामतीत घड्याळ बंद पाडणार -राष्ट्रवादीचे घड्याळ बारामतीमध्ये बंद पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने आम्ही काम करत असल्याचे स्पष्ट करत बावनकुळे म्हणाले, बारामती शहराचा विकास म्हणजे संपूर्ण बारामती लोकसभा मतदार संघाचा विकास नाही. पुरंदर, इंदापूर तालुक्यातील परिस्थिती पाहिल्यानंतर वस्तुस्थिती लक्षात येईल. त्यामुळेच आम्ही बारामती मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामण बारामतीला आल्यानंतरच सुप्रिया सुळेंनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला.