कराड (सातारा) - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, सहकार व पणन मंत्री तथा सातार्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे आज सातारा जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज रविवारी सकाळी कराडच्या यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि उपाययोजना यासंदर्भात आढावा बैठक होणार आहे.
शरद पवार यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे कराड दौर्यावर; कोरोना संदर्भात घेणार बैठक
सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि उपाययोजना यासंदर्भात कराडमध्ये आढावा बैठक होणार आहे. ही बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ही बैठक कराडच्या यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात होईल.
आरोग मंत्री राजेश टोपे हे कोल्हापूर येथून कराडकडे निघणार आहेत. सकाळी 10.30 वाजता कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात त्यांचे आगमन होईल. 11 वाजता आरोग्यमंत्री टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आणि शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती व उपाय योजनांबाबत प्रशासकीय आढावा बैठक होईल. यावेळी सातार्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचीही उपस्थिती राहणार आहे.
सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संदर्भातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन काय उपाययोजना कराव्यात, याचा शरद पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आढावा घेणार आहेत.