महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shambhuraj Desai : पहाटेचा शपथविधी बेईमानी नव्हती का?; शंभुराज देसाईंचा अजित पवारांना सवाल - अजित पवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या पक्षात राहिले, वाढले त्याच पक्षाशी बेईमानी केल्याची टीका अजित पवारांनी (Ajit Pawar) केली होती. त्याला उत्पादन शुल्क मंत्री तथा सातार्‍याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी पाटणमधील (shambhuraj desai in Patan) पत्रकार परिषदेत प्रत्त्युत्तर दिले आहे. (shambhuraj desai press conference).

Shambhuraj Desai
Shambhuraj Desai

By

Published : Nov 6, 2022, 3:46 PM IST

सातारा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या पक्षात राहिले, वाढले त्याच पक्षाशी बेईमानी केल्याची टीका अजित पवारांनी (Ajit Pawar) केली होती. त्याला उत्पादन शुल्क मंत्री तथा सातार्‍याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी पाटणमधील (shambhuraj desai in Patan) पत्रकार परिषदेत प्रत्त्युत्तर दिले आहे. (shambhuraj desai press conference). पहाटेचा शपथविधी करून 48 तासांचे सरकार स्थापन करण्याची कृती बेईमानी नव्हती का? असा सवाल शंभुराजेंनी अजितदादांना केला आहे.

शंभुराचे देसाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वाभिमानी नेते -शंभूराज देसाई म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वाभिमानी नेते आहेत. 40 आमदार 12 खासदार, बहुतांशी जिल्हाप्रमुख हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत. त्यांच्या भुमिकेला व उठावाला अजित पवार बेईमानी शब्द वापरतात, हे चुकीचे आहे. 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेऊन पहाटेचा शपथविधी करून 48 तासांचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पक्षप्रमुख शरद पवारांना विचारले होते का? मग आपण केलेली ती बेईमानी नव्हती का? आम्ही तो शब्द वापरला तर तो योग्य होईल का? अजितदादांची काम करण्याची पद्धत सडेतोड असली तरी बोलताना कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांमध्ये असंतोष निर्माण होणार नाही, याची खबरदारी आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी घ्यावी. शिंदे समर्थक यापुढे असली वक्तव्ये कदापीही सहन करणार नाहीत, असा इशाराही त्यांनी अजित पवार यांना दिला आहे.

उध्दव ठाकरेंनी हिंदुत्वापासून दूर नेले -शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना हिंदुत्वापासून दूर नेण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मागील अडीच वर्षात काळात केले, असा आरोप शंभूराज देसाईंनी केला. आम्ही शिवसेनाप्रमुखांचे विचार जोपासण्याचे काम खर्‍या अर्थाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करीत आहोत. म्हणूनच संपूर्ण राज्यातुन आमच्या उठावाला भक्कम पाठिंबा मिळत आहे. काँग्रेसचे आमदार फडणवीसांच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य करणार्‍या चंद्रकांत खैरे यांना सध्या काही काम नसल्याने ते आमच्यात भांडणे लावायचा उद्योग करीत असल्याची टीका शंभूराज देसाईंनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details