सातारा :महाबळेश्वरमधील नावली गावात शेतजमिनीवर अवैध बांधकाम केल्याचा (agricultural land and illegal construction) आरोप झाल्यानंतर, उत्पादन शुल्क मंत्री तथा सातार्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai Criticized Anil Parab) यांनी माध्यमांसमोर येत खुलासा केला आहे. कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्याची माझी (Ready to face any enquiry) तयारी आहे, असे ते यावेळी म्हणाले.
कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा : घरासह शेतजमिनीची मी रितसर खरेदी केली आहे. आरोप करणार्यांप्रमाणे मी कुठेही समुद्रकिनारी बेकायदेशीर रिसॉर्ट बांधलेले नाही. अथवा ते पाडण्याचे न्यायालयाने आदेश दिलेले नाहीत. अनिल परब यांनी केलेले बेछूट आरोप मागे घ्यावेत. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा मंत्री देसाई यांनी दिला.
अनिल परब यांचे आरोप निराधार :मी निवडणूक शपथपत्रात जागेचा आणि बांधकामाचा उल्लेख केला आहे. आमदार अनिल परब यांनी केलेल्या आरोपांना कोणताही आधार नाही. नावली (ता. महाबळेश्वर) येथील घर असलेली शेतजमीन 2003 मध्ये खरेदी केली आहे. ही शेतजमीन आणि त्यावरील घर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असून, त्याबाबतचा 8/अ चा उतारा माझ्या नावे आहे. या संदर्भातील चौकशीला मी सामोरा जाईल, दूध का दूध, पाणी का पाणी करण्याची माझी तयारी आहे. परंतु, केवळ आपल्या नेतृत्वाला खूश करण्यासाठी अनिल परब यांनी धादांत खोटे आरोप केले आहेत. त्यांनी आरोप मागे घ्यावेत. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे स्पष्टीकरण शंभूराज देसाईंनी दिले आहे.