महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाटण तालुक्यात परदेशातून आलेल्यांसह 79 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले - Patan corona cases

पाटण तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 137 इतकी झाली आहे. यापैकी 81 जण कोरोनामुक्त झाले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यातील 50 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

79 persons swab sending for test
पाटणमधील 79 जणांचे स्वॅब तपासणीसाठी

By

Published : Jul 11, 2020, 7:09 AM IST

पाटण(सातारा)- पाटण तालुक्यातील कसणी येथील एका 50 वर्षीय महिलेचा कोरोना तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामुळे आता तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 137 इतकी झाली आहे. बोंद्री व उरूल येथील प्रत्येकी एक अशा दोन पुरुषांनी कोरोनावर मात केल्याने तालुक्यातील कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या 81 इतकी झाली आहे. सध्या 50 व्यक्तींवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. परदेशातून (कतार) येथून आलेले 31 जण व अन्य 48 अशा एकूण 79 व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

तालुक्यातील कसणी येथील एका 50 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर तिच्यावर तातडीने पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत.बोंद्री व उरूल येथील प्रत्येकी एक अशा दोन व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, परदेशातून (कतार) आलेल्या तालुक्यातील 31 व्यक्तींना निसरे येथील एका खासगी हाॅटेल मध्ये संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले होते. या सर्वांचे स्वॅब घेण्यात आले. 31 जणांसह तळमावले व पाटण या ठिकाणच्या एकूण 79 व्यक्तींचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

आतापर्यंत तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 137 इतकी झाली असून त्यापैकी 81 व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यात आतापर्यंत चार महिला व दोन पुरुष अशा सहा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

सध्या 50 व्यक्तींवर कृष्णा व सह्याद्री हॉस्पिटल, कराड व कोरोना केअर सेंटर, पाटण येथे पुढील उपचार सुरू आहेत. सध्या पाटण येथील कोरोना केअर सेंटर, प्रियदर्शनी महिला वसतिगृह, मिल्ट्री बाॅइज होस्टेल व तळमावले कोरोना केअर सेंटर या ठिकाणी एकूण 88 व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details