सातारा :अट्टल चोरटा संजय अंकुश मदने आणि त्याच्या टोळीने सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक, सातारा ग्रामीण हद्दीत तीन, वाठार हद्दीत सहा आणि कोरेगाव हद्दीत सात, अशा एकूण १७ घरफोड्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. यामध्ये कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक घरफोड्या झाल्या आहेत. कोरेगाव तालुक्यातील एका घरफोडीच्या गुन्ह्यात एलसीबीने त्याला अटक केली होती. त्यानंतर सातारा ग्रामीण पोलिसांनी त्याला तपासासाठी ताब्यात घेतले होते. तपासात त्याने १७ गुन्ह्यांची कबुली दिली.
उत्कृष्ट कामगिरीबद्दल रिवार्ड देणार :गुन्हे उघडकीस आणून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांना दुसऱ्याच दिवशी रिवार्ड देणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रवींद्र भोरे, उपनिरीक्ष्क अमित पाटील, अंमलदार उत्तम दबडे, संतोष पवार, विजय कांबळे, संजय शिकें, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रविण फडतरे, लक्ष्मण जगधने, निलेश काटकर, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश कापरे, मोहन पवार, वैभव सावंत, रोहित निकम, विशाल पवार, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, मयुर देशमुख, केतन शिंदे, शिवाजी गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दहशत माजवणारे ताब्यात :साताऱ्यातील पोवई नाका परिसरात कोयते नाचवत दहशत निर्माण करणाऱ्या संशयितांना ताब्यात घेण्यात यश आले आहे. संशयित परजिल्ह्यातील आहेत. पोलिसांचे पथक त्यांना घेऊन साताऱ्याकडे रवाना झाले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली. दरम्यान, संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांची पायी गस्त सुरू केली जाणार आहे. घातक शस्त्रे विक्री करणाऱ्या आणि जवळ बाळगणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.