कराड (सातारा) - सख्ख्या बहिणीवर अत्याचार करणाऱ्या नराधम भावाला बाल लैंगिक हिंसाचार संरक्षण कायद्यान्वये दोषी धरून कराड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी दीड वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. शंकर काशिनाथ पवार (रा. वाटोळे, ता. पाटण), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
बहिणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला दीड वर्षे सक्तमजुरी
बहिणीवर अत्याचार करणाऱ्या नराधम भावाला बाल लैंगिक हिंसाचार संरक्षण कायद्यान्वये दोषी धरून कराड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी दीड वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. शंकर काशिनाय पवार (रा. वाटोळे, ता. पाटण), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
कुटुंबासह पाटण येथे राहत असताना आरोपीने २०१९ साली सख्ख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केले होते. याप्रकरणी पीडित मुलीने भावाविरुद्ध पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंद झाला होता. पाटणच्या तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. शिंदे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सरकार पक्षातर्फे खटल्यातील सहा महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. त्यांच्या साक्षी आणि सहायक जिल्हा सरकारी वकील मिलींद कुलकर्णी यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर.औटी यांनी आरोपीस दोषी धरून दीड वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.