महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उरमोडी धरण व कालवा परिसरात जमाव बंदीचे आदेश लागू; उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश - दुष्काळी माण खटाव तालुका

दुष्काळी माण खटाव तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुराचे वाहून जाणारे पाणी या भागात सोडण्याचे आदेश दिले. मात्र हे पाणी कालव्यामार्फत येत असताना अनेक भागात कालवे फोडण्यात आले आहेत.

उरमोडी धरण व कालवा परिसरात जमाव बंदीचे आदेश लागू; उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश

By

Published : Aug 20, 2019, 6:19 PM IST

Updated : Aug 21, 2019, 7:29 PM IST

सातारा -दुष्काळी माण खटाव तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. अजुनही अनेक भागात चारा छावण्या देखील सुरू आहेत. उरमोडी धरणाचे पाणी सोडण्यासाठी अनेक आंदोलन देखील केली गेली.

उरमोडी धरण व कालवा परिसरात जमाव बंदीचे आदेश लागू; उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश
पुराचे पाणी माण खटाव तालुक्यातील गावांना सोडण्यात यावे, यासाठी म्हसवड बंदची देखील हाक देण्यात आली होती. यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुराचे वाहून जाणारे पाणी या भागात सोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हे पाणी कालव्यामार्फत येत असताना अनेक भागात कालवे फोडण्यात आले आहेत.यावरती माण खटावचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी कालवे व पाणी साठवण तलाव या ठिकाणी कलम 144 लागू केले आहे. त्यामुळे या भागात व परिसरात जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. माण तालुक्यातील नागरिकांनी या ठिकाणी सहकार्य करावे. मागणी केलेल्या सर्व गावांना पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच सर्व पाणी साठे हे पिण्याच्या पाण्यासाठी व चारा छावण्यांसाठी असतील, असे कांबळे यांनी सांगितले.
Last Updated : Aug 21, 2019, 7:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details