महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला; शासकीय रुग्णालयात दाखल - corona

६३ वर्षीय रुग्णाला ताप व घसा दुखत असल्यामुळे त्याला तातडीने शासकीय रुग्णालयामधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. या संशयित रुग्णाचा अहवाल मिळाला असून तो कोरोनाविषाणू बाधित असल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले आहे.

satara corona
सातारा

By

Published : Mar 24, 2020, 8:38 AM IST

Updated : Mar 24, 2020, 10:05 AM IST

सातारा- शहरात कोरोना विषाणूबाधित असलेला आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे, जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन झाली आहे. हा रुग्ण वृद्ध असून तो कॅलिफोर्निया येथून शहरात दाखल झाला होता. मात्र, प्रकृती बिघडल्याने या रुग्णास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ताप व घसा दुखत असल्यामुळे ६३ वर्षीय रुग्णाला तातडीने शासकीय रुग्णालयामधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. या संशयित रुग्णाचा अहवाल मिळाला असून तो कोरोनाबाधित असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले. दुबई येथून सातारा जिल्ह्यात आलेल्या ४५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा-प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे नागरिकांना भावनीक आवाहन

Last Updated : Mar 24, 2020, 10:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details