महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिंताजनक : साताऱ्यात 'कोरोना'चा दुसरा बळी - जिल्हा रुग्णालय सातारा

सातारा जिल्ह्यात 'कोरोना'मुळे दुसरा बळी गेला आहे. कराड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका 54 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

District Hospital Satara
जिल्हा रुग्णालय सातारा

By

Published : Apr 11, 2020, 12:05 PM IST

सातारा - जिल्ह्यात कोरोनाने (कोविड-19) आज दुसरा बळी घेतला आहे. कराड येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका 54 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

जिल्हा रुग्णालय सातारा

हेही वाचा...जगभरात कोरोना विषाणूमुळे 1 लाख नागरिकांचा मृत्यू

कराड येथील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या या रुग्णाला मधुमेह आणि जंतू संसर्गाचाही त्रास होता, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

हा रुग्ण मुंबई येथे मत्स्य व्यवसाय करत होता. तो 21 मार्च रोजी त्याच्या गावी आला. 30 मार्च ला त्याला खोकल्याचा त्रास सुरु झाल्याने त्याला रुग्णालयाता दाखल करण्यात आले होते. दि. 6 एप्रिल रोजी त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना कोरोना चाचणीसाठी घेण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. याच कोरोनाबाधित रुग्णाचा आज पहाटे 5 वाजता मृत्यु झाला, असे डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details