सातारा - शुक्रवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 189 वी जयंती साताऱ्यातील त्यांच्या नायगाव या जन्मगावी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. शुक्रवारी सकाळी महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष आणि कॅबनेट मंत्री छगन भुजबळ यांनी या स्मारकाला भेट दिली. यानंतर भुजबळ यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंच्या मूर्तीला अभिवादन केले. त्यानंतर दिवसभर इथे निरनिराळ्या गावातील नागरिकांनी अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
सावित्रीबाई फुले जयंती : क्रांतीज्योतींच्या जन्मगावी उत्साह - savitribai fule janmagav naygav latest news
जयंतीच्या निमित्ताने सोनी मराठी वाहिनीवरील 'सावित्रीज्योती' या मालिकेतील कलाकारांनी खास पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकार परिषदेनंतर मालिकेतील प्रमुख कलाकारांनी देखील याठिकाणी तयार करण्यात आलेल्या विशेष कलादलनाला भेट दिली.
सावित्रीबाई फुले जयंती : क्रांतीज्योतींच्या जन्मगावी उत्साह
जयंतीच्या निमित्ताने सोनी मराठी वाहिनीवरील 'सावित्रीज्योती' या मालिकेतील कलाकारांनी खास पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकार परिषदेनंतर मालिकेतील प्रमुख कलाकारांनी देखील याठिकाणी तयार करण्यात आलेल्या विशेष कलादलनाला भेट दिली.
हेही वाचा -ठाण्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सावित्रीबाईंचे मुखवटे लावून आंदोलन; 8 तारखेपासून देशव्यापी संप