महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जय पराजयापेक्षा जनहित महत्वाचे - सत्यजीतसिंह पाटणकर - चाफळ येथे सत्यजीतसिंह पाटणकरांनी कार्यकर्त्यांना संबोधीत केले

विधानसभा निवडणुकीत भलेही अपेक्षित मते मिळाली नाहीत. तरीही आपण सर्वांनी मिळून येणाऱ्या काळात या पंचायत समिती गणांमध्ये अपेक्षित विकास साधणे हेच आपले ध्येय असल्याचे, सत्यजीतसिंह पाटणकर यांनी म्हटले.

सत्यजीतसिंह पाटणकर

By

Published : Nov 10, 2019, 10:08 AM IST

सातारा -जिल्ह्यातील चाफळ विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार यांचे आभार मानण्यासाठी सत्यजीतसिंह पाटणकर चाफळ येथे आले होते. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत भलेही अपेक्षित मते मिळाली नाहीत. तरीही आपण सर्वांनी मिळून येणाऱ्या काळात या पंचायत समिती गणांमध्ये अपेक्षित विकास साधणे हेच आपले ध्येय असल्याचे, म्हटले आहे. तसेच जय पराजय याहीपेक्षा आपल्यावर विश्वास ठेवणारी जनता आणि त्यांच्या सुख-दु:खात आपण सातत्याने सहभागी होणे, हेच आपले कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा... 'शिवसेना-भाजपने सरकार स्थापन करावे, आम्ही विरोधात बसण्याची वाट बघतोय'

सत्यजीतसिंह पाटणकर यांनी यावेळी बोलताना सर्वांना सोबत येण्याचे आवाहन केले. तसेच मतदारसंघाला सार्वत्रिक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले आणि निश्चितच त्यात आपण यशस्वीही झालो, असल्याचेही म्हणाले. चाफळचे राम मंदिर, पर्यटन विकास, ग्रामीण विकास, डोंगरपठारांवर पवनचक्क्या आदी सार्वत्रिक विकास आपल्या माध्यमातून झाला. यापुढच्या काळात आपल्याला पहिल्यांदा आपापल्यामधील अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून एकत्रित येवून बेरजेचे राजकारण करायचे आहे. हे करताना सार्वजनिक व वैयक्तिक कामांना प्राधान्यक्रम द्यायचा आहे आणि या सकारात्मक बाबींवरच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपल्याला बहुमताने विजय मिळवायचा आहे. त्यामुळे मी यानंतरही पुर्वीप्रमाणेच आपण तुमच्या पाठीशी राहणार आणि तुम्हीही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहनही सत्यजीतसिंह पाटणकर यांनी यावेळी केले.

हेही वाचा... नंदुरबार जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, काँग्रेस आमदारांची मागणी

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details