महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shivendraraje Bhosale: सातारा विकास आघाडीने राजकारणातून रिटायरमेंट घ्यावी - शिवेंद्रराजे भोसले

शहराच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार्‍या उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीने (Satara Vikas Aghadi) आता नगरपालिका राजकारणातून रिटायरमेंट घ्यावी, असा खोचक सल्ला आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी दिला आहे.

Shivendraraje Bhosale
Shivendraraje Bhosale

By

Published : Nov 18, 2022, 3:23 PM IST

सातारा - पालिकेवर प्रशासक आल्यावर त्यांचे नगराध्यक्ष व नगरसेवक कुठे गेले? प्रशासक आला की त्यांची जबाबदारी संपली का? गेल्या पाच वर्षात कोणी किती बिले काढली. कमिशनमधून किती मलिदा लाटला, हे सगळ्यांना माहिती आहे, असा टोला आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी (Shivendraraje Bhosale) सातारा विकास आघाडीला (Satara Vikas Aghadi) लगावला आहे. नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्यामुळे सातारकरांना मिठ्या मारणे, पप्पी घेण्याचे प्रकार पहायला मिळतील. पुन्हा निवडून द्या म्हणतील. परंतु, मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार्‍या उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीने नगरपालिका राजकारणातून रिटायरमेंट घ्यावी, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला. (Udayanraje Bhosale Satara Vikas Aghadi).

आता नौटंकी सुरू होईल -निवडणूक लागली की सातारा विकास आघाडीचे नेते मतं मागायला येणार आहेत. त्यांना मतांसाठी सातारकर पाहिजेत. शाहूनगर परिसरात स्वच्छता होत नाही. स्वच्छतेचे टेंडर कोणत्या नगरसेवकाला याचा त्यांच्यातच वाद आहे. ठेकेदाराची नेमणूक होत नाही. राज्य सरकारच्या योजनेतील काम मर्जीतल्या ठेकेदाराला मिळाले नाही म्हणून काही दिवस काम पुढे ढकला ढकली करून अडवले. कमिशनबाजीमुळे कामे पुढे ढकलणे, हेच त्यांचे काम असून सातारा शहराचा त्यांना विचार नसल्याचेही शिवेंद्रराजे म्हणाले.

आता सत्ताधारी कुठे गेले ? -आमदार शिवेंद्रराजे म्हणाले की, आता प्रशासक असला तरी समस्या सोडवण्यासाठी पाच वर्षे सत्तेत असणार्‍यांनी आले पाहिजे. पालिका प्रशासनावर कोणीतरी लक्ष ठेवले पाहिजे. प्रशासक आला म्हणून ते हात झटकून बसले आहेत. सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांची जबाबदारी असताना ते पुढे येत नाहीत. खासदारांच्या सातारा विकास आघाडीने पालिकेच्या निवडणुकीतून सरळ रिटायरमेंट घ्यावी, असा टोलाही शिवेंद्रराजेंनी लगावला.

ABOUT THE AUTHOR

...view details