सातारा - हिमाचल प्रदेशातील मनाली येथे ट्रेकिंग प्रशिक्षणासाठी ( Satara Trekkers bus accident in Himachal Pradesh ) गेलेल्या सातार्यातील ट्रेकर्सच्या ट्रॅव्हल बसला अपघात झाला आहे. या अपघातात बस चालक ( Satara Trekkers bus accident news ) गंभीर जखमी झाला असून, बसमधील 7 प्रशिक्षणार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.
सातार्यातील ट्रेकर्सच्या बसला हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये अपघात, 7 प्रशिक्षणार्थी जखमी - सातारा ट्रेकर्स बस अपघात हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशातील मनाली येथे ट्रेकिंग प्रशिक्षणासाठी ( Satara Trekkers bus accident in Himachal Pradesh ) गेलेल्या सातार्यातील ट्रेकर्सच्या ट्रॅव्हल बसला अपघात झाला आहे. या अपघातात बस चालक ( Satara Trekkers bus accident news ) गंभीर जखमी झाला असून बसमधील 7 प्रशिक्षणार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.
![सातार्यातील ट्रेकर्सच्या बसला हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये अपघात, 7 प्रशिक्षणार्थी जखमी satara Trekkers bus accident in Mandi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15484593-thumbnail-3x2-op.jpg)
सातारा जिल्हा परिषदेमार्फत सातार्यातील 51 ट्रेकर्सना प्रशिक्षणासाठी मनालीला पाठविण्यात आले होते. महाबळेश्वर ट्रेकर्स आणि शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या एकूण 51 प्रशिक्षणार्थींचा त्यात समावेश होता. हिमाचल प्रदेशातील मंडी येथे दोन बसचा समोरासमोर अपघात होऊन ट्रेकर्सच्या बसमधील 7 जण जखमी झाले. बसचा चालक गंभीररित्या जखमी आहे.
एक महिन्याचा माउंटिंग एअररिंगचा कोर्स पूर्ण करून परतत असताना हा अपघात झाला आहे. मनाली येथील अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटिंग एअररिंगमध्ये एक महिना हे प्रशिक्षण सुरू होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्स, शिवेंद्रराजे ट्रेकर्सचे कार्यकर्ते, तसेच सातारा जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी हे प्रशिक्षणार्थींच्या संपर्कात राहून परिस्थितीची माहिती घेत आहेत.
हेही वाचा -सातारा बसस्थानकात शिवशाही बसच्या चाकाखाली सापडून वृद्धा जागीच ठार