सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढत असतानाच जिल्हा पोलिस दलातही आठ पोलिस कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे सर्व कर्मचारी सातारा तालुका पोलीस ठाण्यातील आहेत.
आठ पोलीस अणि तीन होमगार्ड बाधित
सातारा तालुका पोलीस ठाण्यातील आठ कर्मचारी कोरोनाबाधित निघाल्याने खळबळ - सातारा तालुका तीन होमगार्ड कोरोना बाधित
सातारा तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांची बुधवारी दुपारी कोरोना चाचणी करण्यात आली, यामध्ये आठ पोलीस कर्मचारी आणि तीन होमगार्ड कोरोना बाधित आढळून आले. त्यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांना अलंकार हॉल येथे विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलंय.
सातारा तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांची बुधवारी दुपारी कोरोना चाचणी करण्यात आली, यामध्ये आठ पोलीस कर्मचारी आणि तीन होमगार्ड कोरोना बाधित आढळून आले. त्यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांना अलंकार हॉल येथे विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलंय. पहिल्या लाटेमध्ये जवळपास 600 हून अधिक कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले होते, तर दुसऱ्या लाटेमध्ये 64 जण बाधित आढळून आले आहेत.
कर्मचाऱ्यांची प्रकृती चांगली
एकाच वेळी बुधवारी आठ कर्मचारी बाधित आढळून आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सर्व कर्मचाऱ्यांची प्रकृती चांगली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये बुधवारी दुपारी पोलिसांनी 70 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेतली, यामध्ये दोघे पॉझिटिव्ह आढळून आले. संबंधित व्यक्तिंना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा-खासदार संभाजीराजे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार आहेत. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे