महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Satara Student Stuck In Ukraine : कराडच्या प्रतिक्षाने रोमानियातून साधला 'ईटीव्ही भारत'शी संवाद, सांगितला रोमांचक अनुभव - भारतीय विद्यार्थी रोमानियात पोहोचले

Satara Student Stuck In Ukraine : कराडची प्रतिक्षा अरबुणे ही सोमवारी (दि. 28 फेब्रुवारी) रोमानियाची राजधानी बुखारेस्टमध्ये दाखल झाली आहे. तिच्या बरोबर अनेक भारतीय विद्यार्थी आहेत. त्याठिकाणी विद्यार्थ्यांची रोमानियन प्रशासनाने अत्यंत चांगल्या प्रकारे सोय केली आहे. प्रतिक्षाने ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी संवाद साधत लवकरच ( pratiksha Arbune interact with ETV Bharat from Romania ) आम्ही मायदेशी परतणार असल्याचे सांगितले.

Satara Student Stuck In Ukraine
प्रतिक्षा अरबुणे

By

Published : Mar 3, 2022, 3:33 PM IST

Updated : Mar 3, 2022, 5:03 PM IST

कराड (सातारा) - भारतातील विद्यार्थी रशिया-युक्रेनमधील युध्दाचा भडका उडाल्यामुळे मोठ्या प्रमाणात युक्रेनमध्ये अडकलेले ( Indian Student Stuck In Ukraine ) आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी नजीकच्या राष्ट्रांमध्ये पोहोचले आहेत. कराडची ( Satara Student Stuck In Ukraine ) ही सोमवारी (दि. 28 फेब्रुवारी) रोमानियाची राजधानी बुखारेस्टमध्ये दाखल झाली आहे. तिच्या बरोबर अनेक भारतीय विद्यार्थी आहेत. त्याठिकाणी विद्यार्थ्यांची रोमानियन प्रशासनाने अत्यंत चांगल्या प्रकारे सोय केली आहे. प्रतिक्षाने ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी संवाद साधत लवकरच आम्ही मायदेशी परतणार ( pratiksha Arbune interact with ETV Bharat from Romania ) असल्याचे सांगितले.

प्रतिक्षा अरबुणे हिच्याशी साधलेला संवाद

रोमानियन सरकारकडून विद्यार्थ्यांची सोय -

युक्रेनची राजधानी कीव तसेच खार्किव्ह, ओडेसा येथे शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी पाच दिवसांपुर्वी रोमानियाची राजधानी बुखारेस्टमध्ये दाखल झाले आहेत. बुखारेस्टमधील प्रशासनाने विमानतळापासून एक किलोमीटर अंतरावर त्यांची निवास आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. युक्रेनमधून बाहेर पडल्यानंतर विद्यार्थ्यांना खूप मोठा प्रवास करावा लागला. रेल्वे बंद होत्या. त्यामुळे कार आणि ट्रॅव्हल्सने विद्यार्थी पोलंड, रोमानियाच्या सीमेवर पोहोचले. खाण्या-पिण्याची आणि निवासाची सोय होईपर्यंत विद्यार्थ्यांचे हाल झाले. त्यांना पुरेशी झोपदेखील मिळाली नाही. मात्र, रोमानियाची राजधानी बुखारेस्टमध्ये दाखल झाल्यानंतर तेथील प्रशासनाने विद्यार्थ्यांची चांगली सोय केली असून विद्यार्थ्यांना आराम मिळाल्याचे प्रतिक्षा अरबुणे हिने सांगितले.

रोमानियामध्ये राहत असलेले विद्यार्थी

भारत सरकारचे मानले आभार -

युध्दजन्य परिस्थितीच्या ताण-तणावानंतर आणि आठ-नऊ तासांच्या प्रवासानंतर सुरक्षित ठिकाणी पोहलेल्या विद्यार्थ्यांची यथोचित सोय झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. एका मोठ्या हॉलमध्ये विद्यार्थ्यांना अंघोळीचे गरम पाणी, साबण, शांपू, टूथपेस्ट, नाष्टा, जेवण, मोबाईल चार्जिंगची सुविधा आणि झोपण्यासाठी ट्रॅकिंग सूट उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी मागणी केल्यानंतर आवश्यक त्या गोष्टी पुरविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना काय हवे आहे का, याची ठराविक वेळानंतर येऊन कर्मचारी विचारणा करतात. भारतीय दुतावासाच्या प्रयत्नामुळे भारतीय विद्यार्थी सुरक्षितरित्या युक्रेनमधून बाहेर पडू शकले. या विद्यार्थ्यांची काळजी घेतल्याबद्दल आणि त्यांना सोयी-सुविधा मिळण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल भारत सरकारचे विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत.

बुखारेस्टमध्ये महाराष्ट्रातील 15 विद्यार्थी -

युक्रेनच्या विविध भागातील विद्यार्थी दि. 28 फेब्रुवारीला बसमधून रोमानियाच्या सीमेवर पोहोचले. प्रत्येक बसमध्ये शंभर विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांना घेऊन दहा बस रोमानियाच्या सीमेवर गेल्या. तेथून विद्यार्थी राजधानी बुखारेस्टमध्ये दाखल झाले. त्याठिकाणी वेगवेगळ्या हॉलमध्ये त्यांची सोय करण्यात आली. महाराष्ट्रातील 15 विद्यार्थी बुखारेस्टमध्ये असल्याचे कराडच्या प्रतिक्षा अरबुणेने सांगितले.

दोन दिवसात मायदेशी परतणार -

रोमानियात आलेल्या विद्यार्थ्यांना आता विमानाची तिकिटे दिली जात आहेत. भारतीय वायु दलाची विमाने देखील येत आहेत. त्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थी येत्या दोन दिवसात मायदेशी दाखल होणार आहोत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी आमच्या आसपास आहेत. ते सर्व मायदेशी दाखल होतील, असे प्रतिक्षाने ईटीव्ही भारतशी संवाद साधनाता सांगितले.

पाटणचा पराग मोरे आज मायदेशी परतणार -

पाटण तालुक्यातील संगमनगरचा रहिवासी पराग मोरे याला काल (बुधवारी) विमानाचे तिकीट मिळाले. आज रात्री उशीरा तो भारतात परतणार आहे. त्याला रिसिव्ह करण्यासाठी त्याचे आई-वडील रात्री मुंबईला रवाना झाले आहेत. पराग हा ओडेसा शहरात एमबीबीएसच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे. तेथे युद्धाची धग वाढू लागल्यानंतर तो रोमानियात आला. आज तो मायदेशात परतणार आहे.

हेही वाचा -Kharkiv in Blast : असा दिवस कुणाच्या आयुष्यात येऊ नये; खार्कीव्हमधील ब्लास्टनंतर ठाणेकर विध्यार्थ्याचे शब्द

Last Updated : Mar 3, 2022, 5:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details