एसटी चालकाचे प्रसंगावधान; नदीत जाणारी बस झाडावर नेऊन रोखली, मोठा अपघात टळला - सातारा
सातारा-कोरेगाव येथे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पुलानजीक दहिवडीवरून साताऱ्याला जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला.

सातारा
सातारा - सातारा-कोरेगाव येथे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पुलानजीक दहिवडीवरून साताऱ्याला जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. या अपघातात अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. पुढे काही अंतरावरच नदी असल्याने मोठा अनर्थ घडला असता.