सातारा: जिल्ह्यात लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा पसरविल्या जात असल्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी शहानिशा केली असता ती अफवा सिद्ध झाली आहे. जाणीवपूर्वक अफवा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिला आहे.
मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा पसरविणाऱ्यांवर सातारा एसपींचा कारवाईचा इशारा - सातारा एसपींचा कारवाईचा इशारा
लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. अफवा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिला आहे.
![मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा पसरविणाऱ्यांवर सातारा एसपींचा कारवाईचा इशारा Satara SP warns of action against those who spread rumors of child abduction gang](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16472575-thumbnail-3x2-rapecase.jpg)
सातारा पोलीस दलाकडून शहानिशासातारा जिल्ह्यात लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रिय आहे, अशी चर्चा सुरू होताच सातारा पोलीस दलामार्फत शहानिशा करण्यात आली. मात्र, ती मुले पळविणाऱ्या टोळीबाबतची चर्चा ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे जाणीवपूर्वक अफवा पसरविण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिला आहे.
अफवांवर विश्वास ठेऊ नकासातारा जिल्हा पोलीस दल सतर्क आणि सज्ज असून नागरीकांच्या सुरक्षिततेची सर्वोतोपरी काळजी घेण्यात आली आहे. नागरीकांनी तथ्यहिन अफवांवर विश्वास ठेऊ नये. आपल्या परिसरामध्ये कोणीही अनोळखी व्यक्ती, संशईत हालचाली आढळून आल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, नियंत्रण कक्ष सातारा तसेच डायल ११२ वर संपर्क साधावा. कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे अवाहन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केले आहे.