साताराSatara Riot News : खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात रविवारी रात्री जमावानं केलेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल १३ तासांनंतर नातेवाईकांनी ताब्यात घेतलाय. मुख्य सूत्रधाराला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका जमावानं घेतली होती. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी योग्य त्या कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झालाय.
भाजपा पदाधिकाऱ्यावर आरोप :दंगलीत तरूणाचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण आहे. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर हे या दंगलीचे सूत्रधार असल्याचा आरोप करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी योग्य त्या कारवाईचं आश्वासन दिलं, त्यानंतर १३ तासांनी नातेवाईकांनी तरूणाचा मृतदेह ताब्यात (Satara Riot youth death) घेतलाय.
२०० जणांवर दंगलीचा गुन्हा :दंगलीत तरूणाच्या झालेल्या मृत्यूमुळं सातारा जिल्हा रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमला होता. तक्रार देण्यासाठी शिष्टमंडळानं पोलिस अधीक्षकांची भेट घेतलीय. चर्चेअंती पुरवणी जबाबात भाजपाचे पदाधिकारी विक्रम पावसकर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानं तरूणाचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतलाय. दंगलीत जखमी झालेल्या सर्फराज बागवान यांच्या फिर्यादीवरून औंध पोलीस ठाण्यात तब्बल २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात (Satara Riot News Silent march) आलाय.