महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gunaratna Sadavarte Custody : गुणरत्न सदावर्तेंचा ताबा सातारा पोलीस घेणार - गुणरत्न सदावर्ते सातारा पोलीस मराठी बातमी

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte ) यांना सातारा पोलिसांना ताबा घेण्याचा आदेश दिला आहे. मात्र, कागदपत्रांची पूर्तता करायची असल्याने उद्या ताबा मिळण्याची शक्यता आहे.

Gunaratna Sadavarte Custody
Gunaratna Sadavarte Custody

By

Published : Apr 13, 2022, 6:14 PM IST

Updated : Apr 13, 2022, 10:11 PM IST

सातारा - एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte ) यांचा न्यायालयाने सातारा पोलिसांना ताबा घेण्याचा आदेश दिला. मात्र, कागदपत्रांची पूर्तता करायची असल्याने गुणरत्न सदावर्ते यांची आर्थर जेलमध्ये रवानगी करण्यात आली.

तेढ निर्माण होईल, असे होते वक्तव्य - सातारा पोलिसांना सदावर्ते याचा ताबा उद्या मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने वकील सदावर्तेंनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती आणि सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तेढ निर्माण होईल, असे ते वक्तव्य असल्याने सातारा येथील मराठा मोर्चा समन्वयक राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात फिर्याद दिली होती.

२०२० मधील गुन्हा -धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा सातारा शहर पो.स्टे येथे गु.र. नंबर 781/2020 भादंविसंक 153(अ), 500, 504, 505 (2) व 295 (अ) याप्रमाणे 9 ऑक्टोबर 2020 रोजी गुन्हा दाखल केला होता. सातारा शहर पोलीस ठाण्यात २०२० मध्ये तक्रार दिली होती. दीड वर्षापूर्वी दाखल असलेल्या या गुन्ह्यात त्यांच्यावर कारवाई झालेली नव्हती. आज त्यांना या गुन्ह्यात सातारा पोलिसांना ताब्यात देण्याचा आदेश देण्यात आला.

हेही वाचा -Aryan Khan Case : आर्यन खान प्रकरणात मुंबई एनसीबीचे दोन अधिकारी निलंबित

Last Updated : Apr 13, 2022, 10:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details