महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार; दोन आरोपींवर गुन्हा दाखल - Minor physical abuse case in Satara

आरोपी रणजित बुधावले हा पीडितेच्या ओळखीचा आहे. त्याने अल्पवयीन मुलीला आईकडे नेऊन सोडतो¸ अशी थाप मारली.

पुसेगाव पोलीस ठाणे
पुसेगाव पोलीस ठाणे

By

Published : Jul 21, 2020, 12:20 PM IST

सातारा - अल्पवयीन मुलीला तुझ्या आईकडे नेतो, असे सांगून नराधमाने बलात्कार केल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून खातगुण येथील दोन आरोपींवर पुसेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रणजित बुधावले आणि बापू अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपी रणजित बुधावले हा पीडितेच्या ओळखीचा आहे. त्याने अल्पवयीन मुलीला आईकडे नेऊन सोडतो¸ अशी थाप मारली. त्यानंतर रविवारी दुपारी खातगुण गावच्या हद्दीतील वनीकरणात नेवून आरोपीने मुलीवर बलात्कार केला. रणजीतला बापू ( पूर्ण नाव माहित नाही ) नावाच्या व्यक्तीने मदत केली. बलात्कारानंतर आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही पीडित मुलीने पोलिसांना जबाबात सांगितले. दोन्ही आरोपी घटनेनंतर फरार झाले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details