सातारा - व्हॉट्सअॅपवर बनावट नावाने चॅटिंग करून मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला चोवीस तासाच्या आत अटक करण्यात आली आहे. दहिवडी पोलिसांनी कारवाई केली आहे.
व्हॉट्सअॅपवर खोट्या नावाने चॅंटिंग करून मुलीवर अत्याचार; दोघांना अटक - saratra rape news
व्हॉट्सअॅपवर बनावट नावाने चॅटिंग करून मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला चोवीस तासाच्या आत अटक करण्यात आली आहे. दहिवडी पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
सागर उर्फ श्रीकृष्ण अर्जुन अवघडे (रा. डंगिरेवाडी, ता. माण) हा पीडित मुलीशी सुरज दत्तात्रय नाळे (रा. बारामती) या खोट्या नावाने व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करत होता. मुलीला 'मला भेटायला ये अन्यथा तुझ्या आई-वडिलांचे बरे-वाईट करीन' अशी धमकी देऊन पिडीतेला मोगराळे घाटावर भेटायला बोलवले. भीतीपोटी पीडिता १२ ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आरोपीला भेटायला घाटावर गेली. सागरने पिडीतेशी गोड बोलून तिला राजवडी (ता. माण) हद्दीत नेऊन तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केला. या घटनेचे फोटो सागरचा मित्र पप्पू उर्फ अमोल विलास खरात (रा. दहिवडी, ता. माण) याने मोबाईलवर काढले. तसेच पिडीतेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. परंतू हा गुन्हा दहिवडी पोलीसांच्या हद्दीत घडला असल्यामुळे तो दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.
संशयितांनी वापरलेले मोबाईल बंद करून ठेवला होता. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके तयार करण्यात आली. आरोपीच्या वर्णनावरून तसेच खास बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून तसेच आरोपीच्या गुन्ह्याच्या पूर्वेतिहासावरुन पप्पू उर्फ अमोल यास ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सापडलेल्या मोबाईल मध्ये पिडीतेने सांगितल्यानुसार आक्षेपार्ह फोटो आढळून आले. अमोल यानेच पिडीतेचे फोटो काढल्याचे व जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याने सागर अवघडे असल्याचे सांगितले. सागर हा आपला मोबाईल बंद करुन फरार झाला होता. तो पुणे रेल्वे स्टेशनवर असल्याची माहिती मिळाली. पुणे रेल्वेचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दिक्षित यांच्या पथकाने आरोपी सागर याला ताब्यात घेतले. सागर हा सुरज नाळे ह्या खोट्या नावाने पिडीतेशी चॅटिंग करुन धमकावत होता. पण त्याचे खरे नाव सागर अवघडे असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक डॉ. निलेश देशमुख करत आहेत.