सातारा - छाननीनंतर उरलेल्या 108 उमेदवारांपैकी 35 अर्ज मागे घेण्यात आले असून सध्या जिल्ह्यातील आठ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात 73 उमेदवारांमध्ये लढत आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कराड दक्षिण मतदारसंघात 6 अर्ज मागे घेतल्यानंतरही जिल्ह्यातील सर्वाधिक 13 उमेदवाराची लढत रंगणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे डॉ. अतुल भोसले यांच्यामध्ये चुरशीचा सामना आहे.
हेही वाचा रत्नागिरीतील भाजपचे बंडोबा अखेर थंड; पाचही उमेदवारांनी अर्ज घेतले मागे
सातारा मतदारसंघात आठपैकी 2 अर्ज मागे घेण्यात आले असून, रिंगणात 6 उमेदवार राहिले आहेत. यामध्ये भाजपचे शिवेंद्रराजे भोसले व राष्ट्रवादीचे दिपक पवार यांच्यामध्ये लढत लक्षवेधी असणार आहे. फलटणमध्ये 16 पैकी 5 अर्ज मागे घेण्यात आल्याने सध्या रिंगणात 11 उमेदवार आहेत. वाई मतदारसंघात एकूण 13 पैकी तिघांनी माघार घेतल्याने उरलेल्या 10 उमेदवारांमध्ये लढत आहे. कराड उत्तर मतदारसंघात 11 पैकी 5 उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यात आले असून, उर्वरित 6 जण निवडणूक लढवत आहेत. तसेच कोरेगाव मतदारसंघात 12 मधील 5 अर्ज मागे घेण्यात आले असून, ७ जण रिंगणात आहेत.
हेही वाचा रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ७८ उमेदवार रिंगणात, 34 जणांची माघार
पाटणमध्ये 13 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामधील 4 अर्ज मागे घेण्यात आल्याने 9 उमेदवार मैदानात आहेत. माण मतदारसंघात 16 पैकी 5 अर्ज मागे घेण्यात आले असून, 11 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
लोकसभा पोटनिवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली आहे.