सातारा - जिल्ह्यातील महू धरण किनारी लघुशंकेसाठी गेलेल्या नागरिकाचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महाबळेश्वर ट्रॅकर जवानांच्या आठ तासाच्या शोध मोहिमेनंतर नागरिकाचा मृतदेह मिळाला आहे.
महू धरणात पाय घसरून पडल्याने नागरिकाचा मृत्यू - सातारा जावळी तालुका
साताऱ्यातील महू धरण किनारी लघुशंकेसाठी गेलेल्या नागरिकाचा पाण्यात पडून मृत्यू झाला आहे.
किसन महादेव गावडे, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते साताऱ्यातील बेलोशी येथील रहिवासी आहेत. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पाण्यात पाय घसरून पडल्यामुळे ते महू धरणाच्या पाण्यात वाहून गेले होते. कालपासूनच त्यांचा तपास सुरू केला होता. बुधवारी महाबळेश्वर ट्रॅकरच्या जवानांनी आठ तासाची शोध मोहीम राबवून किसन गावडे यांचा मृतदेह शोधून काढला आहे.
जावळी तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने महू धरणाच्या पाण्याचा फुगवटा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. धरणात पाणी अडविण्यात आल्याने घरणातील पाणी बॅकवॉटर क्षेत्रातील गावांपर्यंत आले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने किसन गावडे यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात बुडाले. त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे