सातारा - जिल्ह्यातून जाणाऱ्या लोहमार्गावर रेल्वेचे थांबे वाढवावेत यासह प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सातारा रेल्वे पोलीस ठाणे सुरू करावे, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी बुधवारी लोकसभेत केली.
सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या मध्य रेल्वे मार्गाच्या संदर्भातील मुद्दे लोकसभेत उपस्थित करत श्रीनिवास पाटील यांनी या मागण्या केल्या. ते म्हणाले, पुणे-मिरज-हुबळी मध्य रेल्वे मार्गावरील लोणंद या ठिकाणी मोठी बाजारपेठ व औद्योगिक क्षेत्र आहे. तसेच आषाढ महिन्यात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणावरून जात असते. या पालखी सोहळ्यास लोखो भाविकांची उपस्थिती असते. परंतु, हे शहर रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला वसलेले आहे. त्यामुळे एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत. याठिकाणी एक 'अंडर पास' व दोन 'ओव्हर ब्रीज' बांधल्यास ते नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे ठरेल.
हेही वाचा -एनसीबी 'ड्रग्ज' तपास: एकाकडून दुसरा, दुसऱ्याकडून तिसरा, तिसऱ्याकडून अनेकांचे कसे होते संबंध?