महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mp Shriniwas Patil Corona Positive : साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांना कोरोनाची लागण - साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील

साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांना कोरोना संसर्ग झाला ( Shriniwas Patil Corona Positive ) आहे. पुढील उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहे. तसेच, संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Shriniwas Patil
Shriniwas Patil

By

Published : Jan 21, 2022, 5:05 AM IST

सातारा -साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला ( Shriniwas Patil Corona Positive ) आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल झाले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांत संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

सातारा जिल्हाभर लोकसभा मतदार संघाचे कार्यक्षेत्र असल्यामुळे विकासकामांचे भुमिपुजन, उद्घाटनाच्या कार्यक्रम, लग्न समारंभ, मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबांची सांत्वन यांनी ते उपस्थित राहतात. या दगदगीमुळे त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे चाचणी केली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

संपर्कातील सर्वांनी तपासणी करून घ्यावी

सोशल मीडियावर पोस्ट करत श्रीनिवास पाटील ( Shriniwas Patil Social Media Post )म्हणाले, "माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते उपचार सुरु आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी. स्वतःबरोबर कुटुंबाची काळजी घ्या, सुरक्षित रहा," असे आवहन त्यांनी केले आहे.

कराडचे मुख्याधिकारीही पॉझिटिव्ह

कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना दोन दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते घरगुती विलगीकरणात आहेत. दरम्यान, कराड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत ( karad Corona Cases Increased ) आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येतही भर पडली आहे.

हेही वाचा -Jitendra Awhad On Amol Kolhe : अमोल कोल्हेंच्या चित्रपटाला विरोध करणार, आव्हाड आक्रमक

ABOUT THE AUTHOR

...view details