सातारा - आता मतदान केंद्र आणि मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मतदारांना मोबाईल घेऊन जाता येणार नाही. यामुळे निवडणूक गोपनियतेचा भंग होत असल्याच्या कारणाने निवडणूक आयोगाने ही मनाई केली आहे. त्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे मतदारांना मोबाईल घरात अथवा मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसराबाहेर ठेऊनच मतदानाला जावे लागणार आहे.
मतदानाला जाताना मोबाईल घरीच ठेवा - निवडणूक आयोग - मतदानाला जाताना मोबाईल घरीच ठेवा
ईव्हीएम मशिनवर बटण दाबून मतदान करताना तसेच व्हीव्हीपॅटवर दिसणार्या मतदात्याच्या नावाचे मोबाईलवर चित्रिकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. अशा प्रकारांमुळे निवडणूक गोपनियतेचा भंग होत असल्याचे लक्षात आल्यानंतर निवडणूक आयोगाने मतदान केंद्र आणि केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाईल नेण्यास मनाई केली आहे.
हेही वाचा -अखेर मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरला राणेंचा 'स्वाभिमान' भाजपमध्ये होणार विलिन
ईव्हीएम मशिनवर बटण दाबून मतदान करताना तसेच व्हीव्हीपॅटवर दिसणार्या मतदात्याच्या नावाचे मोबाईलवर चित्रिकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. अशा प्रकारांमुळे निवडणूक गोपनियतेचा भंग होत असल्याचे लक्षात आल्यानंतर निवडणूक आयोगाने मतदान केंद्र आणि केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाईल नेण्यास मनाई केली आहे. प्रथमच मोबाईल बंदीचे परिपत्रक निवडणूक आयोगाने जारी केले आहे. त्या परिपत्रकाची काटेकोर अमंलबजावणी करण्याचे आदेश निवडणूक निवडणूक निर्णय अधिकार्यांना दिले आहेत. परिणामी मतदारांना मतदान केंद्रात आणि केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाईल, कॉर्डलेस फोन, वायरलेस संच घेऊन जाता येणार नाही.