माण-खटावमध्ये सगळ्यात कमी कोरोनाचा प्रादुर्भाव - आमदार जयकुमार गोरे - satara corona update news
प्रशस्त जागा व रुग्णांना संसर्ग होणार नाही याची मोठी काळजी घेतली जाते आहे. त्यामुळे रुग्ण संख्या आटोक्यात आली. इतरांशी संपर्क तुटल्यामुळे साखळी तुटण्यास मदत झाली. तसेच प्रवास करून आलेल्यांना होम क्वारंंटाईंन केले गेले. त्याचा फायदा झाल्याचे आमदार जयकुमार गोरे म्हणाले.
सातारा - माण खटाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अडीचशे पार झाली असून त्यापैकी अनेक रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील तालुक्याच्या मानाने माण खटावमधील रुग्णांची संख्या कमी आहे. तालुक्यातील प्रशासन व आम्ही घेतलेल्या दक्षतेमुळे रुग्ण संख्या काही प्रमाणात आटोक्यात आहे, अशी माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.
तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पहिल्या पासूनच कमी होती. आरोग्य विभागाने गावोगावी सर्व्हे करून रुग्ण आढळलेल्या ठिकाणी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना सुरुवातीला होम क्वारंटाईंन केले. नंतर नंतर सर्वांना कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवले. या मध्ये म्हसवडमधील तीन मोठ्या इमारती मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह तसेच दहिवडी येथील मुला-मुलींचे वसतिगृह आज उपयोगी पडत आहेत. आज या इमारती नसत्या तर मोठा फटका बसला असता. प्रशस्त जागा व रुग्णांना संसर्ग होणार नाही याची मोठी काळजी घेतली जाते आहे. त्यामुळे रुग्ण संख्या आटोक्यात आली. इतरांशी संपर्क तुटल्यामुळे साखळी तुटण्यास मदत झाली. तसेच प्रवास करून आलेल्यांना होम क्वारंंटाईंन केले गेले. त्याचा फायदा झाल्याचे ते म्हणाले.
तर खटाव तालुक्यात देखील बंद पडलेलं हॉस्पिटल मी चालू करून पाचशे बेड हॉस्पिटल पुन्हा उभे केले आहे. त्या मध्ये आज माण खटाव तालुक्यातील अनेक नागरिक उपचार घेत आहेत. माझ्या तालुक्यातील एकाही नागरिकाला बाहेर उपचारासाठी जावे लागत नाही. या ठिकाणी कोणाकडून कसला ही मी एक पैसा घेतला नाही. चार ते पाच रुग्णांना त्या ठिकाणी फक्त काही महात्मा फुले आरोग्य योजना लागू झाली आहे. शासनाने फक्त चार ते पाच आरोग्य सेविका तसेच एक डॉक्टर दिला आहे बाकी सगळे माझ्या हॉस्पिटलमध्ये स्टाफ आहे. असे देखील त्यांनी ईटीव्ही भारत सोबत बोलताना सांगितले.