सातारा -नातेवाईक महिलेशी असलेले अनैतिक संबंध उघड करण्याची धमकी देऊन 50 हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी शाहुपुरी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी किशोर बाळासाहेब कांबळे (वय 31 रा. एल.आय.सी. कॉलनी, शाहूपुरी) याला पोलिसांनी अटक केली आहे तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे. याबाबत वैभव अनंत गोळे (वय 20, रा. मोरावळे, ता. जावली) यांनी फिर्यादीत दिली होती.
गोळे यांची एका महिलेबरोबर ओळख झाली. त्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलणेही सुरू होते. या दोघांमधील मोबाईल चॅटिंग लक्षात आल्यानंतर किशोर बाळासाहेब कांबळे व अन्य दोघांनी संगनमत करून वैभव गोळे यांना पोलिसात तक्रार करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून वेळोवेळी 50 हजारांची खंडणी उकळली.