महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Satara Maan Tehsildar Suspended साताऱ्यातील माणचे तहसीलदार निलंबित, वाळू उपशाकडे दुर्लक्ष करणे भोवले - तहसीलदार सुर्यकांत येवले निलंबित

माण तालुक्यातील बेकायदा वाळू उपसाप्रकरणी illegal sand extraction maan satara तहसीलदार सुर्यकांत येवले tahasildar Yewale suspended satara यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामुळे माण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Satara Maan Tehsildar Suspended
साताऱ्यातील माणचे तहसीलदार निलंबित

By

Published : Aug 26, 2022, 10:53 PM IST

सातारा माण तालुक्यातील बेकायदा वाळू उपसाप्रकरणी illegal sand extraction maan satara तहसीलदार सुर्यकांत येवले tahasildar Yewale suspended satara यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामुळे माण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. Satara Maan Tehsildar Survyakant Yewale Suspended


बेकायदा वाळू चोरीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष भोवलेमाण तालुक्यात चोरून वाळूचा बेसुमार उपसा केला जात होता. त्याबाबत वारंवार जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या जात होत्या. मात्र, आमच्या भागात कोणतीही बेकायदा वाळू उपसा आणि वाहतूक होत नसल्याचे माणच्या महसूल विभागाकडून सांगितले जात होते. माण आणि खटाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारींची तहसीलदारांनी दखल घेतली नाही. वाळू उपशाकडे दुर्लक्ष करून वाळू चोरांना अभय देणे तहसीलदारांना भोवल्याची चर्चा माण तालुक्यात आहे.


तहसीलदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीमाण तालुक्यातील शिरताव गावच्या हद्दीतील ओढ्यातून हजारो ब्रास वाळू चोरून नेल्यानंतर उपसरपंच किरण शामराव खळवे यांनी तहसीलदार येवले यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबन करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी एकाही अनधिकृत खडी क्रशर अथवा वाळू चोरीविरोधात कारवाई केलेली नाही.


परिविक्षाधीन अधिकाऱ्याने कारवाईचा बडगा उगारलापरिविक्षाधीन अधिकारी रिचर्ड यानथन यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर माण तालुक्यातील अनाधिकृत खडी क्रशरवर दंडात्मक कारवाई करून ते सील केले होते. तसेच वाळू चोरांनाही हिसका दाखवला. त्यामुळे तहसीलदार येवले यांचा कामचुकारपणा समोर आला. तसेच तहसीलदारांनी अवैध वाळू उपसा आणि अनाधिकृत क्रशरकडे दुर्लक्ष केल्याची बाब समोर आली.


व्हिडिओ-ऑडिओ क्लिपमुळे पाच तलाठ्यांचे निलंबनएका कारवाईवेळची व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पाच तलाठ्यांचे निलंबन केले होते. तत्पूर्वी प्रातांधिकारी आणि तहसीलदार येवले या दोघांनाही कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी तहसीलदार सूर्यकांत येवले यांना थेट निलंबित करण्यात आल्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.


वर्षभरात सात महसूल कर्मचाऱ्यांचे निलंबनगेल्या दहा वर्षात माण महसूल विभागातील एकाही कर्मचाऱ्यांचे प्रमोशन झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. माण तालुका दुष्काळी आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. नदी आणि ओढ्यांमध्ये मुबलक वाळू असल्याने सोलापूर आणि साताऱ्यातील वाळू सम्राटांचा माण तालुक्यात धुमाकूळ असतो. अवैध वाळू उपशाकडे जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षामुळे एका वर्षात माणमधील सात कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.

हेही वाचाSangli Cannabin Field ऊसाच्या शेतात गांजाची शेती, कोट्यवधी रुपये किंमतीची गांजाची झाडे जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details