महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातार्‍याची पोटनिवडणूक लांबणीवर; लोकसभेच्या ६४ जागांवरील पोटनिवडणुकीत समावेश नाही - udayanraje bhosale news

साताऱ्यातील खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. मागील दहा दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यापूर्वी त्‍यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्ली येथे दिला आहे. छत्रपती उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यामुळे सातार्‍यात लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे.

सातार्‍याची पोटनिवडणूक लांबणीवर

By

Published : Sep 21, 2019, 4:23 PM IST

सातारा- विधासभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे. दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात निवडणुकीचे निकालही जाहीर होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीमध्ये आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यासोबतच महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा आणि देशातील लोकसभेच्या ६४ जागांवरील पोटनिवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. मात्र, यामध्ये महाराष्ट्रातील साताऱ्यातील पोटनिवडणुकीचा समावेश नाही. त्यामुळे सातार्‍याची पोटनिवडणूक लांबणीवर पडली असल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा-पश्चिम महाराष्ट्र विभाग - कोण मारणार 'बाजी'? राजकीय परिस्थितीचा आढावा...

साताऱ्यातील खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. मागील दहा दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यापूर्वी त्‍यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्ली येथे दिला आहे. छत्रपती उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यामुळे सातार्‍यात लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे. आज ६४ जागेवरील पोटनिवडणुकीच्या मतदान कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र, यामध्ये सातार्‍याच्‍या पोटनिवडणुकीचा समावेश करण्यात आला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details