कराड दमदार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा नव्वदीपार गेला आहे. धरणात सध्या 91.42 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. शुक्रवारी सकाळी उघडण्यात आलेले धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटावर स्थिर ठेवण्यात आले आहेत.
धरणात सध्या 91.42 टीएमसी इतका पाणीसाठा सातारा - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पाणीसाठा नव्वदीपार गेला आहे. धरणात सध्या 91.42 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी उघडण्यात आलेले धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटावर स्थिर ठेवण्यात आले आहेत.
कोयनेतून 11,372 क्युसेक्स पाण्याचा विसर्गकोयना धरणात प्रतिसेकंद 54,835 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे दीड फुटाने उघडून 11,372 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाणीसाठ्यात पावणे पाच टीएमसीने वाढकोयना धरणात प्रतिसेकंद 54,835 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे गेल्या चोवीस तासात पाणीसाठ्यात तब्बल पावणे पाच टीएमसीने (4.73 TMC) वाढ झाली आहे. पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोरधरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या चोवीस तासात कोयनानगर येथे 96 मिलिमीटर, नवजा येथे 125 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 179 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणाचे दरवाजे आणि पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद 11,372 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.