सातारा -मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. आज अटाळी गावानजीक हॉटेल हेरिटेजवाडीच्या जवळील सातारा-कास रस्ता खचला. त्यामुळे हा रस्ता सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आला. कास पठार समिती घटना स्थळी दाखल झाली असून खबरदारी घेतली जात आहे.
अतिवृष्टीमुळे सातारा-कास रस्ता खचला, वाहतूक बंद - kas road issue
महाबळेश्वर आणि कास पठाराला पावसाने मोठ्या प्रमाणात झोडपले असल्याने पर्यटक आणि स्थानिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.
खचलेला रस्ता
मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर पूर्व भागात आज ही ८५ चारा छावण्या व १७८ पाणी टँकर चालू आहेत. महाबळेश्वर आणि कासला मोठ्या प्रमाणात पावसाने झोडपले असल्याने पर्यटक आणि स्थानिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.