सातारा - कराडमध्ये 2 तर जावळीतील एका रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 14 झाला आहे. सातत्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असून ही संख्या 15 च्या जवळ जाऊन पोहोचल्याने सातारा जिल्हा 'रेड झोन'च्या उंबरठ्यावर आहे.
सातारा 'रेड झोन'च्या उंबरठ्यावर..कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने चिंतेत भर! - corona in satara
कराडमध्ये 2 तर जावळीतील एका रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 14 झाला आहे. सातत्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असून ही संख्या 15 च्या जवळ जाऊन पोहचल्याने सातारा जिल्हा 'रेड झोन'च्या उंबरठ्यावर आहे.
जिल्ह्यात काल (रविवारी) एकाच वेळी तीन रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. त्यात कराडमधील दोन, तर जावळीतील एकाचा समावेश आहे. नागपूर व पुणे येथे प्रवास करून आलेल्या 2 युवकांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. तर जावळीतील एका बाधित रुग्णाच्या सान्निध्यात आलेला तरूण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता. त्याचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर काल त्याचा दुसरा अहवाल पाॅझिटिव्ह आलाय.
तीन पाॅझिटिव्ह रुग्णांमुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 14 झाली आहे. यापैकी तिघे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दोघांचा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झालाय. राज्याचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी झोन्स विषयी अधिका-यांना व्हिडिओ काॅन्फरन्सिंग द्वारे माहिती दिली. यामध्ये सातत्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. गेल्या १४ दिवसांत अॅक्टीव्ह रुग्ण न आढळल्यास संबंधित भाग ऑरेंज झोनमध्ये येतो. ग्रीन झोन म्हणजे असा ऑरेंज झोन, ज्यामध्ये त्याच्या पुढील १४ दिवस एकही रुग्ण आढळत नाही. राज्य शासनाच्या या निकषांनुसार सातारा 'रेड झोन'च्या उंबरठ्यावर आहे. जिल्हाबंदी असली तरीही पुण्यातील वाढती बाधितांची संख्या चिंतेत भर घालणारी आहे.
साताऱ्यातील कोरोनाबाधितांचा आकडा
1. क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय- 379
2. कृष्णा हॉस्पीटल कराड- 276
3. एकूण दाखल - 655
(प्रवासी-120, निकट सहवासातील व्यक्ती - 403, तीव्र जंतू संसर्ग - 132)
4. कोरोना नमुने घेतलेले एकूण- 665
5. कोरोना बाधित अहवाल - 14
6 कोरोना मुक्त - 3
7. मृत्यू 2