सातारा- अतिवृष्टी व अवकाळी पावसाने फलटण तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. पालकमंत्र्यांनी शेतामध्ये जाऊन पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतल्या. पंचनामे व कागदपत्रांची पूर्तता होईल तशी शेतकऱ्यांना ताबडतोब मदत दिली जाईल, नुकसान झालेल्या सर्वांना मदत दिली जाईल, असेही शिवतारे यांनी यावेळी सांगितले.
अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल, असे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी रविवारी फलटण तालुक्यातील कापडगाव, तरडगाव, काळज येथील शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निबांळकर, आमदार दिपक चव्हाण, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलीस उप अधीक्षक धीरज पाटील, प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार हणुमंत पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा -पुणे विभागातील 1 लाख 40 हजार हेक्टर शेतीचे नुकसान, त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश