कराड (सातारा) - राज्याचे सहकार व पणन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना मुंंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. बाळासाहेब पाटील हे आता मुंबईतील आपल्या निवासस्थानीच विश्रांती घेणार असून लवकरच ते कराडला परतणार आहेत, अशी माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
सातार जिल्ह्याचे पालकमंत्री कोरोनामुक्त, जिल्ह्यात लवकरच परतणार - satara corona patient news
14 ऑगस्टला त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्याच रात्री ते मलकापूर (कराड) येथील कृष्णा रुग्णालयात दाखल झाले. मंगळवारी सकाळी त्यांना मुंबईला हलवण्यात आले होते. तेव्हापासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पाटील यांच्यावर उपचार सुरू होते. डॉ. उडवाडिया यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी पाटील यांना देण्यात येणार्या औषधांची मात्राही कमी करण्यात आली होती.

मागील आठवड्यात 14 ऑगस्टला त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्याच रात्री ते मलकापूर (कराड) येथील कृष्णा रुग्णालयात दाखल झाले होते. मंगळवारी सकाळी त्यांना मुंबईला हलवण्यात आले. तेव्हापासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पाटील यांच्यावर उपचार सुरू होते. डॉ. उडवाडिया यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी पाटील यांना देण्यात येणार्या औषधांची मात्राही कमी करण्यात आली होती. प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली आहे. बाळासाहेब पाटील यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर आता ते मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेत असून लवकरच ते जिल्ह्यात परतणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.