महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर कोरोना पॉझिटिव्ह - satara corona latest update

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून ते गृह विलगीकरणात आहेत. गेल्या 15 दिवसांत आपणाशी ज्यांचा संपर्क आला होता, त्यांनी गृह विलगीकरण करावे व आठव्या दिवशी कोरोना चाचणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सातारा संजीवराजे नाईक निंबाळकर
सातारा संजीवराजे नाईक निंबाळकर

By

Published : Aug 18, 2020, 9:16 AM IST

सातारा - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा साडेसात हजारांच्यावर गेला आहे. आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून ते गृह विलगीकरणात आहेत.

याबाबत संजीवराजे यांनी सांगितले की, 'कोरोनाची लक्षणे असल्याने आपण स्वतः कोरोना चाचणी करून घेतली असता ती पॉझिटीव्ह आली. सध्या माझी प्रकृती उत्तम आहे. तथापि, गेल्या 15 दिवसांत आपणाशी ज्यांचा संपर्क आला होता, त्यांनी गृहविलगीकरण करावे व आठव्या दिवशी कोरोना चाचणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, बाहेर पडल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे पूर्ण पालन करावे, मास्क वापरावा,' असे आवाहनही त्यांनी केले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details