महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन मागे

क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रूग्णालयात गेल्या २ महिन्यांपासून वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचाऱ्यांचे पगार थकल्यामुळे २ दिवसापासून कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन चालू केले होते. मात्र, त्याची दखल वरिष्ठांनी घेतल्याने हे आंदोलन मागे घेतले असल्याचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील, रूग्णालय

By

Published : Apr 25, 2019, 4:59 PM IST

सातारा - क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेले ठिय्या आंदोलन आज मागे घेतले. २ दिवस चालेल्या या आंदोलनाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली. पगार जमा होतील, या आश्वासनावर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

सातारा जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन मागे

सिव्हिल रूग्णालयात मागील अनेक वर्षांपासून सावळागोंधळ सुरू आहे. या रूग्णालयात पुरेसे डॉक्टर नाहीत. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. रुग्णसेवेसाठी उपलब्ध असलेली साधने अक्षरशः धूळ खात पडलेले आहेत. त्यांचा योग्य प्रकारे उपयोग केला जात नाही. अनेक वेळा औषधे संपली असल्याचे सांगून रुग्णांना बाहेरून औषधी आणायला सांगितली जाते. या अनेक कारणांमुळे जिल्हा रुग्णालय सध्या चर्चेत आहे.

गेल्या २ महिन्यांपासून वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचाऱ्यांचे पगार थकल्यामुळे २ दिवसापासून कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन चालू केले होते. मात्र, त्याची दखल वरिष्ठांनी घेतल्याने हे आंदोलन मागे घेतले असल्याचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले आहे. तसेच रुग्णालयात तातडीची आणि अत्यावश्यक सेवा देण्यासाठी काही कर्मचारी कार्यरत होते. तर २०० कर्मचारी या ठिय्या आंदोलनात सामील झाले. रुग्णांना व नातेवाईकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दखल आम्ही घेतली असल्याचे चव्हाण यांनी माध्यमांना सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details