सातारा - सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकच्या जयराम स्वामी वडगाव (ता. खटाव) येथील शाखेत शनिवारी मध्यरात्री चोरीचा धाडसी प्रयत्न ( satara district bank robbery attempt )झाला. मात्र, बँकतील भोंग्यामुळे चोरट्यांनी पळ काढला. चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. बँकतील रोख रक्कम सुरक्षित राहिल्याने अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
चोरट्यांनी बँकेत प्रवेश केल्यावर सीसीटीव्ही कँमेरे बंद केले. त्यानतंर खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून बँकेचे शाखेत प्रवेश करत, तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बँकेतील भोंग्यामुळे ग्रामस्थ जागे झाले. त्यांनी बँकेकडे धाव घेतल्यामुळे चोरट्यांनी पळ काढला.