महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा जिल्हा बँक निवडणूक : सहकार मंत्र्यांची बाजी, गृहराज्यमंत्री पराभूत - Co-operation Minister Balasaheb Patil

कराड सोसायटी गटात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बाजी मारली, तर पाटण सोसायटी मतदार संघात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसल्याचे चित्र निकालातून समोर आले आहे. या निवडणुकीत कराड आणि पाटणमधील दोन्ही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. ( Satara District Bank Election )

Satara District Bank Election
सहकार मंत्र्यांची बाजी, गृहराज्यमंत्री पराभूत

By

Published : Nov 23, 2021, 12:43 PM IST

कराड (सातारा) - सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील ( Satara District Bank Election ) कराड सोसायटी गटात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील ( Co-operation Minister Balasaheb Patil ) यांनी बाजी मारली, तर पाटण सोसायटी मतदार संघात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ( Shambhuraj Desai, Minister of State Home Affairs ) यांना पराभवाचा धक्का बसल्याचे चित्र निकालातून समोर आले आहे. या निवडणुकीत कराड आणि पाटणमधील दोन्ही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दोन्ही निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते.

सहकार मंत्र्यांची पुढच्या दाराने एन्ट्री -

कराड सोसायटी मतदार संघात माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकरांचे पूत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समोर आव्हान निर्माण केले होते. विलासकाका उंडाळकर यांनी सलग ११ वेळा (५४) सोसायटी मतदार संघाचे नेतृत्व केले होते. त्यांच्या निधनानंतर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी या मतदार संघातील उमेदवारी दावेदारी केली. जिल्हा बँकेच्या सर्वपक्षीय पॅनेलने त्यांची उमेदवारी कायम ठेवल्याने अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. यामध्ये सहकार मंत्री पाटील यांना ७४ तर उदयसिंह पाटील यांना ६६ मते मिळाली. ८ मतांनी सहकार मंत्र्यांनी बाजी मारत पुढच्या दाराने जिल्हा बँकेत एन्ट्री केली आहे. मागील पाच वर्षे ते स्वीकृत संचालक होते.

भाजपाच्या साथीने विजय सुकर -

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना विजयासाठी भाजपच्या डॉ. अतुल भोसले यांच्या गटाची मदत घ्यावी लागली. माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते यांची देखील सहकार मंत्र्यांना मदत झाली. सत्ता आणि उंडाळकर विरोधी गटांनी सहकार मंत्र्यांना साथ केल्याने बाळासाहेब पाटील यांना विजय मिळविता आला. २००८ साली बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाआघाडी गठीत करून सत्तांतर घडवले होते. आताही तोच फॉर्म्युला वापरून सहकार मंत्री विजयापर्यंत पोहोचले. दुसरीकडे विलासकाका उंडाळकरांच्या निधनानंतर अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी उंडाळकर गटाची ताकद कायम राखली आहे. त्यामुळे सर्व विरोधक एकत्र आल्याशिवाय उंडाळकर गटाचा पराभव करणे शक्य नसल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.

गृहराज्यमंत्र्यांचा धक्कादायक पराभव -

पाटण सोसायटी मतदार संघातील निवडणुकीत माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पूत्र सत्यजितसिंह पाटणकर यांनी ५८ मते मिळवून बाजी मारली. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना ४४ मतांवर समाधान मानावे लागले. विक्रमसिंह पाटणकर यांनी देखील अनेक वर्षे सोसायटी मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी त्यांनी पूत्र सत्यजितसिंह यांना निवडणुकीत उतरवले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील प्रथमच जिल्हा बँकेची निवडणूक लढविली. मात्र, त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला.

हेही वाचा -Satara DCC निवडणुकीत दिग्गजांना धक्का : शंभूराज देसाई व शशिकांत शिंदे यांनी गमावल्या जागा

ABOUT THE AUTHOR

...view details