सातारा - क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे पुणे जेलमधून सातारा जेलमध्ये प्रवास करून आलेले कैदी आणि उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे बाधित रुग्णाचे निकट सहवासित एक (वय वर्षे 6) अशा एकूण 3 नागरिकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते कोरोनाबाधित असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
साताऱ्यात आणखीन तिघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, पुण्यातून आलेल्या कैद्यांचा समावेश
3 नागरिकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते कोरोनाबाधित असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना
तर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 40, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 16 अशा 56 नागरिकांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे. आता सातारा जिल्ह्यात 66 रुग्ण कोरोनाबाधित असून आतापर्यंत 9 बरे होऊन रुग्णालयातून सोडले आहेत, तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 77 बाधित रुग्ण आढळले आहेत.
Last Updated : May 3, 2020, 5:33 PM IST