सातारा Satara Crime News :कराडमध्ये शनिवारी दुपारी धारदार शस्त्राने सपासप वार करून भर चौकात तरूणाची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव स्मारकासमोर ही थरारक घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला. शुभम रविंद्र चव्हाण (वय २२, रा. वडोली निळेश्वर, ता. कराड), असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.
घटनेमागील नेमकं कारण अस्पष्ट : खून झालेला शुभम चव्हाण हा वडोली निळेश्वर येथे राहत होता. त्याचा कराडमध्ये सलूनचा व्यवसाय करत होता. हल्लेखोर तरूणाशी त्याची ओळख होती. काही तरी कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. वाद मिटवून घेण्यासाठी शुभम दोन मित्रांना सोबत घेऊन कार्वे नाक्यावर गेला होता. मात्र, हल्लेखोराने रागाच्या भरात शस्त्राने सपासप वार करून शुभमचा खून केला. त्यांच्यातील वादाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.