सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गावर गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडले आहे. त्यांच्याकडून चारचाकी वाहन, दोन मोबाईल विदेशी मद्याचे 110 बॉक्स, असा १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अजय वसंत कुळधरण, साहिल रामदास धात्रक (रा. पिंपरी लोके, ता. राहाता, जि. अहमदनगर) यांना अटक करण्यात आली आहे.
दारू लपविण्यासाठी कॅरेटचा वापर :राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गावर नांदलापूर (ता. कराड) गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. महिंद्रा कंपनीच्या पिकअप गाडीचा (क्र. MH-17-BY-9437) संशय आल्याने वाहनाची तपासणी करण्यात आली. आंब्याच्या कॅरेटमध्ये लपवून ठेवलेले गोवा बनावटीच्या दारूचे एकूण 110 बॉक्स (1 हजार 320 सिलबंद बाटल्या) आढळून आले.